Skip to main content

 सर्व ग्रंथपाल मित्रांचे स्वागत. या ब्लॉगवर मी ग्रंथालयात उपयुक्त अश्या Technology बद्दल पोस्ट लिहिणार आहे. तरी याचा अनेक ग्रंथपाल व ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकतो. सध्या अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे ग्रंथपाल म्हणून महाविद्यालयीन ग्रंथालय (College Library) व्यवस्थापन करत आहे. या आधी फ्लेम विद्यापीठ, पुणे व इटन टेक. पुणे येथे ग्रंथपाल म्हणून काम केले आहे. एकूण १५ वर्षांचा अनुभव असून, या ब्लॉगवर मी स्वतः वापरलेल्या टेक्नोलॉजी ज्या ग्रंथालयांना उपयुक्त ठरू शकतात अश्या विषयांवर पोस्ट लिहिणार आहे. माझ्या या कामासाठी तुमची साथ महत्वाची आहे. 

या ब्लॉग वर खालील विषयांवर ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. 

  • कोहा (ILMS Koha)
  • डीस्पेस (DSpace)
  • ओमेका - क्लासिक (Omeka-Classic)
  • वर्डप्रेस (WordPress)
  • नेक्स्टक्लाउड (Nextcloud)
  • MSExcel
  • PowerPoint 
  • Word
  • Ubuntu/Debian OS
  • Windows 
  • Oracle VM VirtualBox
  • PowerBi
  • BarGenPro
  • User Tracking System (UTS)
  • Stock Management Software
  • Storage Sharing
  • Backup Policies
  • IT Policy
धन्यवाद,

प्रदीप बच्छाव 

Popular posts from this blog

सर्व्हर : ग्रंथालय संगणकीकरणाचा मूलभूत घटक

सर्व्हर : ग्रंथालय संगणकीकरणाचा मूलभूत घटक योग्य सर्व्हरची निवड, व्हर्च्युअलायझेशन आणि आमच्या ग्रंथालयातील प्रत्यक्ष अनुभव आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय संगणकीकरणासाठी केवळ चांगले सॉफ्टवेअर असणे पुरेसे नाही, तर त्या सॉफ्टवेअरना सक्षमपणे चालविण्यासाठी योग्य सर्व्हरची निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे. Koha ILMS, VuFind Discovery, DSpace, Omeka, Moodle यांसारखी मुक्त-स्रोत (Open Source) सॉफ्टवेअर वापरताना योग्य हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि Virtualization तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ साधल्यास कमी खर्चातही अत्यंत कार्यक्षम सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर उभारता येते. या लेखामध्ये ग्रंथालयासाठी उपलब्ध असलेले विविध प्रकारचे सर्व्हर, त्यांची वैशिष्ट्ये, Virtualization चे महत्त्व आणि आमच्या ग्रंथालयामध्ये वापरात असलेल्या प्रत्यक्ष सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती दिली आहे. ग्रंथालयासाठी सर्व्हरची उभारणी कशी करता येते? साधारणपणे ग्रंथालयासाठी सर्व्हरची उभारणी पुढील चार प्रकारे करता येते. साधारण डेस्कटॉप संगणक वर्कस्टेशन (Workstation) रॅक सर्व्हर (Rack Server) क्लाऊड सर्व्हर (Cloud Server ...
RAID, NAS, Backup, UPS आणि Virtualization : ग्रंथालय सर्व्हर व्यवस्थापनाची पुढची पायरी Windows Server वर Oracle VM VirtualBox आणि Ubuntu Server वर KVM/QEMU + libvirt + Cockpit वापरून Virtual Server तयार करणे मागील लेखामध्ये आपण “सर्व्हर : ग्रंथालय संगणकीकरणाचा मूलभूत घटक” या विषयाचा अभ्यास केला. ग्रंथालयासाठी Desktop Computer, Workstation, Rack Server आणि Cloud Server यापैकी योग्य पर्याय कसा निवडावा, तसेच चांगल्या कॉन्फिगरेशनच्या संगणकावर Virtualization च्या साहाय्याने अनेक Virtual Servers कसे तयार करता येतात, हे आपण पाहिले. ग्रंथालयामध्ये Koha, DSpace, VuFind, Omeka, Moodle यांसारखी अनेक सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा वापरायच्या असतील, तर प्रत्येक सॉफ्टवेअरसाठी स्वतंत्र Physical Server घेणे नेहमीच आवश्यक नसते. पुरेशी RAM, Processor आणि Storage क्षमता असलेल्या एका सक्षम Server वर Virtualization तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक Virtual Machines तयार करता येतात. आमच्या ग्रंथालयामध्ये याच पद्धतीचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. Windows Server 2022 Host वर Oracle VM VirtualBox आणि Ubuntu 22.04 ...