RAID, NAS, Backup, UPS आणि Virtualization : ग्रंथालय सर्व्हर व्यवस्थापनाची पुढची पायरी Windows Server वर Oracle VM VirtualBox आणि Ubuntu Server वर KVM/QEMU + libvirt + Cockpit वापरून Virtual Server तयार करणे मागील लेखामध्ये आपण “सर्व्हर : ग्रंथालय संगणकीकरणाचा मूलभूत घटक” या विषयाचा अभ्यास केला. ग्रंथालयासाठी Desktop Computer, Workstation, Rack Server आणि Cloud Server यापैकी योग्य पर्याय कसा निवडावा, तसेच चांगल्या कॉन्फिगरेशनच्या संगणकावर Virtualization च्या साहाय्याने अनेक Virtual Servers कसे तयार करता येतात, हे आपण पाहिले. ग्रंथालयामध्ये Koha, DSpace, VuFind, Omeka, Moodle यांसारखी अनेक सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा वापरायच्या असतील, तर प्रत्येक सॉफ्टवेअरसाठी स्वतंत्र Physical Server घेणे नेहमीच आवश्यक नसते. पुरेशी RAM, Processor आणि Storage क्षमता असलेल्या एका सक्षम Server वर Virtualization तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक Virtual Machines तयार करता येतात. आमच्या ग्रंथालयामध्ये याच पद्धतीचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. Windows Server 2022 Host वर Oracle VM VirtualBox आणि Ubuntu 22.04 ...
सर्व्हर : ग्रंथालय संगणकीकरणाचा मूलभूत घटक योग्य सर्व्हरची निवड, व्हर्च्युअलायझेशन आणि आमच्या ग्रंथालयातील प्रत्यक्ष अनुभव आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय संगणकीकरणासाठी केवळ चांगले सॉफ्टवेअर असणे पुरेसे नाही, तर त्या सॉफ्टवेअरना सक्षमपणे चालविण्यासाठी योग्य सर्व्हरची निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे. Koha ILMS, VuFind Discovery, DSpace, Omeka, Moodle यांसारखी मुक्त-स्रोत (Open Source) सॉफ्टवेअर वापरताना योग्य हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि Virtualization तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ साधल्यास कमी खर्चातही अत्यंत कार्यक्षम सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर उभारता येते. या लेखामध्ये ग्रंथालयासाठी उपलब्ध असलेले विविध प्रकारचे सर्व्हर, त्यांची वैशिष्ट्ये, Virtualization चे महत्त्व आणि आमच्या ग्रंथालयामध्ये वापरात असलेल्या प्रत्यक्ष सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती दिली आहे. ग्रंथालयासाठी सर्व्हरची उभारणी कशी करता येते? साधारणपणे ग्रंथालयासाठी सर्व्हरची उभारणी पुढील चार प्रकारे करता येते. साधारण डेस्कटॉप संगणक वर्कस्टेशन (Workstation) रॅक सर्व्हर (Rack Server) क्लाऊड सर्व्हर (Cloud Server ...